Mumbai Elphinstone Bridge : 59 कोटींचा अडथळा, एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम रखडणार | VIDEO

Historic Elphinstone Bridge : मुंबईतील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूलाचं पाडकाम आर्थिक वादामुळे रखडले आहे.पश्चिम रेल्वेने या कामासाठी परवानगी देताना तब्बल 59 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्याचे काम सध्या रखडणार आहे. पश्चिम रेल्वेने या कामासाठी परवानगी देताना तब्बल 59 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र ‘महारेल’ ने ही रक्कम अवाजवी असल्याचं सांगत ती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुलाच्या पाडकामाला आवश्यक रेल्वे ब्लॉक मिळालेला नाही. ‘गतिशक्ती’ आराखड्यानुसार हा प्रकल्प महसूलविना असल्याने जास्त शुल्क आकारणे योग्य नसल्याचं ‘महारेल’चं मत आहे. या वादामुळे पुलाचं काम अडकलं असून नागरिक आणि वाहनधारकांना मोठा फटका बसणार आहे. तसेच वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com