Municipal Election : बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार; निवडणूक आयोगानं काय आदेश दिले?

Municipal Elections in maharashtra : महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच राज्यभरात अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आरोप केले आहेत. आता या बिनविरोध निवडीची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली असून, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं राज्य निवडणूक आयोग दखल घेतलीय. यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगानं दिल्याची माहिती आहे. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने काय आदेश दिलेत ते पाहुयात ठळक मुद्द्यांमधून...

  • निवडणूक आयोगानं बिनविरोध निवडीचा अहवाल मागवला

  • निवडणूक आयोगानं दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

  • दबावाच्या तक्रारींची शाहनिशा होणार आहे.

  • ठाणे आणि पनवेल महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवर विशेष लक्ष

  • भयमुक्त निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सतर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com