Eknath Shinde : शिंदेंना गृह खात्यासह नगरविकास खात्यावरही सोडावं लागणार पाणी? मोठी माहिती आली समोर|VIDEO

Mahayuti Cabinet Expansion : महायुती सरकारच्या खाते वाटपबबत अद्याप निर्णय झालेला नाही. कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं असतानाच आता ज्या खात्यांसाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते, ती खाती त्यांना मिळणार नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपच्या वाट्यातील दोनच खाती भाजपने एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांना देण्याची तयारी दाखवली आहे. विशेष म्हणजे ज्या खात्यासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते ती खाती भाजप सोडणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी कितीही आग्रही असले तरी शिवसेनेला गृह खातं मिळणार नाही आहे, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर आता नगर विकास खात्यावरसुद्धा शिंदेंना पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या वाट्यातील महसूल एकनाथ शिंदेंना आणि गृह निर्माण अजित पवार यांना अशी केवळ दोनच खाती देण्याची तयारी भाजपने दाखवली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सर्व मंत्र्यांची यादी दिल्लीतील भाजप श्रेष्ठींकडून निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाची धाकधूक वाढली असल्याचं बघायला मिळतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com