Eknath Shinde Video: सरकार दिलेला शब्द पाळणार, एकनाथ शिंदेंचं आश्वासन

Eknath Shinde News Today: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजनांवर भाष्य केलं. तसंच विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

हे सरकार दिलेलं शब्द पाळणारं आहे. आतापर्यंत सरकारने जे जे बोललंय, ते ते पूर्ण काम पूर्ण केलंय. त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून या सर्व योजना केल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. ५ रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केली आहे. सोयाबीन आणि कापसाला ४५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे हे सर्व थांबलं होतं. पण आता त्याचंही वाटप होईल. आम्ही सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध हटवले. आमच्या योजनेमुळे विरोधक गॅसवर असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com