Video: रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मुख्यमंत्री भडकले; अधिकाऱ्यांना दिली तंबी, काय म्हणाले?

Eknath Shinde aggressive from potholes on the road : महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. खड्डे लवकर दुरुस्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या स्वत: मुंबई-नाशिक महामार्गाची पाहणी करणार आहेत. खड्ड्यांवरुन मुख्यमंत्री आज अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती झाली नाही, कुणी कामचुकारपणा केला तर FIR दाखल करा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. खड्ड्यांवरुन एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) अधिकाऱ्यांनी थेट तंबीच दिली आहे. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे तातडीने काम सुरु करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com