अंबानींना ईडीचा मोठा दणका! 1 हजार कोटींची मालमत्ता जप्त|VIDE0

ED Seizure Of Reliance Group Assets In Yes Bank Fraud Case: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर ईडीने मोठी कारवाई करत येस बँक घोटाळा आणि आर्थिक अनियमिततेप्रकरणी तब्बल 1,120 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

अनिल अंबानी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहावर मोठी कारवाई केली आहे. येस बँक घोटाळा आणि रिलायन्स समूहाच्या कंपन्यांमधील अनियमिततेप्रकरणी ईडीने अकराशे वीस कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईमुळे जप्त केलेल्या एकूण मालमत्तेचा आकडा आता 10,117 कोटींवर पोहोचला आहे. या कारवाईमध्ये रिलायन्स समूहाच्या विविध कंपन्यांमधील गुंतवणुकीचा समावेश आहे. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) करण्यात आली आहे.

यामध्ये रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिस, रिलायन्स वेंचर अॅसेट मॅनेजमेंट, मे. फी मॅनेजमेंट सोल्यूशन्स मे. अघार प्रॉपर्टी कन्सल्टन्सी मे. गमेसा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या नावे असलेल्या मुदत ठेवी तसेच रिलायन्स वेंचर अॅसेट मॅनेजमेंट आणि मे. फी मॅनेजमेंट सोल्यूशन्स या कंपन्यांमध्ये असलेली अज्ञात समभागांवरही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com