ZP शाळेतील धक्कादायक प्रकार, लाखो रुपयांचा पगार घेणारा शिक्षक गायब; 7 हजारावर डमी महिला शिक्षिका | VIDEO

Dummy Teacher Scam In Mangalwedha ZP School: मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी ZP शाळेत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लाखभर पगार घेणारा शिक्षक शाळेत न जाता एका महिलेकडून सात हजार रुपयांत शिकवून घेत असल्याचे समोर आले आहे.

सुमारे लाखभर पगार घेणाऱ्या एका शिक्षकाने शाळेत न जाता एका महिलेला सात हजार रुपये पगारावर शिकवण्यासाठी नेमले आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद शाळेत समोर आला आहे. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार मेतकुटे यांनी सगळा प्रकार समोर आणला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजकुमार मेतकुटे यांनी थेट शाळेत जाऊन संबंधित महिलेला विचारले असता गेल्या चार महिन्या‌पासून एका शिक्षकाच्या जागेवर सात हजार रूपये पगारावर शिकवण्याचे काम करत असल्याची तिने कबुली दिली आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या ही बोगस दाखवली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारात घोटाळा झाल्याची संशय ही आता व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com