Nandurbar Hevay Rain Video: पावसाचं थैमान,एक्सप्रेसला फटका; सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद!

Nandurbar Rain News: नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा एक्सप्रेसला मोठा फटका बसला आहे. सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबलीये.

काल रात्रीपासून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका आता रेल्वेसेवेला देखील बसला आहे. नंदुरबारमध्ये कोळदा-चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक एक्सप्रेस गाड्या ह्या रेल्वे स्थानकांवर 4 तासांपासून उभ्या आहेत. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याने प्रवाशी त्रस्त झालेत. तसेच मुसळधार पावसामुळे सुरत-भुसावळ (Surat- Bhusaval) मार्गावरील वाहतूक देखील बंद झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com