महिलेच्या बॅगेतून बाहेर आलं ड्रग्ज! मुंबई विमानतळावर १७ कोटींचं कोकेन जप्त,|VIDEO

Major Drug Bust At Mumbai International Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने केलेल्या कारवाईत पावणे दोन किलो कोकेन जप्त करण्यात आले असून, टांझानियाच्या महिलेची अटक करण्यात आली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत तब्बल पावणे दोन किलो कोकेन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल ₹१७ कोटी १८ लाख इतकी असल्याची माहिती मिळते. ही खेप घेऊन आलेली टांझानियाची एक महिला प्रवाशी अटकेत घेतली असून, तिच्या बॅगेतील पॅकेट्समध्ये कुशलतेने कोकेन लपवण्यात आले होते. तसेच तपासादरम्यान तिच्याकडे दोन कॅप्सूलमध्येही कोकेन आढळून आलं आहे. डीआरआयकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, ड्रग्जचा स्रोत, नेटवर्क आणि या प्रकरणातील इतर सहकार्यांचा तपास सध्या सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com