Manmohan Singh Funeral : मनमोहन सिंग यांचा अखेरचा प्रवास, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार | Live Video

Dr. Manmohan Singh Passes Away : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. त्यानंतर त्यांच्यावर आज दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव निगमबोध घाटावर थोड्याच वेळात पोहोचणार आहे. मनमोहन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. डॉ. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि मुलगी दमन सिंग यांनी काँग्रेस मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राहुल गांधी, सोनिया आणि प्रियंका यांच्याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला. त्यानंतर मृतदेह निगमबोध घाटावर नेण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील यात सहभागी होणार आहेत.

गुरुवारी रात्री मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. टे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यानंतर गुरुवारी त्यांना राहात्या घरी भोवळ आल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com