Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोट, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये स्फोट, ३५ ते ४० जण जखमी, अग्निशमन दलाचे जवान दाखल

डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत ३५ ते ४० जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे कंपनीत आणि आजूबाजूच्या परिसरात आग लागली आहे. ही आग लागल्यामुळे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आणि युद्धपातळीवर ही आग शमवण्याचे काम सुरू आहे. या स्फोटाचा परिणाम २०० ते ३०० मीटरपर्यंत होता अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती आहेत. या स्फोटामुळे डोंबिवलीतल्या अनेक इमारतींवरील काचा फुटल्या आहेत. डोंबिवलीत अनेक ठिकाणी काचांचा खच पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com