Video
Video: धुळ्यातील पांझरा नदीवरील पूल बुडाला, मुसळधार पाऊस
या पुलावरून नागरिकांनी न जाण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये जवळपास 14300 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळेच आता धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पांझरा नदीवरील फरशी पूल हा पाण्याखाली गेला असून दुसरा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनातर्फे खबरदारीचे उपाय म्हणून या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आलेले आहेत आणि या पुलावरून नागरिकांनी न जाण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.