धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासून अतिवृष्टीने मोठा कहर केला आहे. परंडा, भूम, कळंब, धाराशिव, उमरगा, लोहारा, तुळजापूर, वाशीसह सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. परंडा आणि भूम तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे शेतात पाणी साठले आहे. पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिरसाव गावात देखील घरात पाणी घुसले आहे गावाचा संपर्क तुटला आहे. नदीच्या दुसऱ्या बाजूला असणारे २०० ते ३०० नागरीक अडकले आहेत. चिंचपूर, बेलगाव येथील नद्यांमुळेही पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांसह द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. जनावरांचा मृत्यू झाला आहे. धाराशिवमध्ये आतापर्यंत १०० पेक्षा अधिक जनावारे वाहून गेली आहेत. देवगाव आणि नरसाळी या गावात सध्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. नागरिकांना वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बचाव पथक यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.