VIDEO: सोलापूरात धनगर समाज आक्रमक, सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन

Solapu Dhangar Samaj Protest : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरात भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर आंदोलकांचे 'ढोल बजावो आंदोलन' सुरू केले आहे.

राज्यभरामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. पंढपुरातील धनगर उपोषणकर्त्याची प्रकृती खालवल्यानंतर राज्यभर आंदोलन चिघळलं. राज्यभरातील लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर जाऊन धनगर आंदोलक ढोल बजाव आंदोलन करत आहेत. सोलापूरमध्ये देखील धनगर समाजाचे आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोलापुरात माजी सहकार मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर आंदोलकांचे 'ढोल बजावो आंदोलन' सुरू आहे. धनगर समाज आक्रमक होताच आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या सुभाष देशमुख यांच्या घराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. सुभाष देशमुख यांना निवेदन दिल्याशिवाय त्यांच्या घरासमोर सुरु असणारे 'ढोल बाजावो आंदोलन' माघारी घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com