Maharashtra Politics : सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, VIDEO

mahayuti government : संपूर्ण राज्याचं महायुतीच्या सत्तास्थापनेकडे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान,देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पोहोचले आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दीड आठवडा झाला आहे. मात्र, महायुतीचा सत्तास्थापनेचा पेच कायम असल्याचं बोललं जात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांत कोणतीही बैठक झाली नव्हती. त्यामुळे महायुतीत सर्व आलबेल आहे का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आज अचानक देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले.

एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. ते आज वैद्यकीय तपासणीसाठी ज्यूपिटर रुग्णालयात पोहोचले होते. त्यानंतर आज दिवसभर शिंदे अॅक्शनमोडमध्ये दिसले. आज एकनाथ शिंदेंनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर ते वर्षा निवासस्थानी पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर या बैठकीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस पोहोचले. या बैठकीत महायुतीचा सत्तास्थापनेचा पेच सुटणार का, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com