VIDEO: Devendra Fadnavis महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र नाहीत, राऊतांचा टोला

Sanjay Raut on Devendra Fadnavis: पत्रकारपरिषदेतून संजय राऊत यांनी शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार बसलेलं आहे, त्याचं आयुष्य दोन किंवा तीन महिन्याचं आहे असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मिंदे काय म्हणतात यावर जग चालत नाही, चोरांचा आणि दरडेखोरांचा उठाव कधी होतो का? तुमच्या हिम्मत होती तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढायला हव्या होत्या असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत मीद्यांनी जिथे जिथे उभे राहिले तिथे लाखो रुपये देऊन मत विकत घेतली

मुख्यमंत्री चार चार दिवस हॉटेलमध्ये जाऊन कसे पैसे वाटत होते. हे आपण पाहिलेल आहे, त्यामुळे हा उठाव कसला, हा पैशांचा, बेईमानीचा उठाव होता असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला शिंदे सरकारवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीवर वक्तव्य केले होते याला संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं, देवेंद्र फडणवीसांनी जे चित्र काढलेले आहे, ते महाराष्ट्राचं इतकं विधारक चित्र आहे. म्हणून त्यांचा लोकसभेत पराभव झाला, म्हणून त्यांना आता अडचण होणारच असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com