VIDEO : 'मराठवड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहाणार नाही', किनवटच्या सभेत फडणवीसांची मोठं विधान

Devendra Fadanvis In Nanded : नांदेडच्या किनवटमध्ये गुरुवारी भाजपचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचाराची सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दुष्काळावर भाष्य केलं.

मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून नोंद झाले आहे. मात्र मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. उच्च पातळी बंधार्‍यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल. निम्न पैनगंगा धरण केलं तर ९५ गाव बुडणार आहेत. म्हणून तो निर्णय मी बदला आहे. या ९५ गावाला मी विस्थापित होऊ देणार नाही. मोदींनी सांगितलं आहे देवेंद्र, एकनाथ शिंदेजी चिंता करू नका. लागेल तो पैसा देऊ. मराठवाड्यात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी किनवटच्या सभेत आज म्हटलं आहे. किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारासाठी गुरुवारी नांदेडच्या किनवटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भिमराव केराम विरुद्ध प्रदीप नाईक अशी लढत याठिकाणी होणार आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं की, पहिल्या 2.5 वर्षात एक रुपयाचा निधी महाविकास आघाडी सरकारने दिला. आपलं सरकार आल्यानंतर हजारो कोटी रुपयांचं काम भीमराव केराम यांनी केलं. त्यामुळे आता चिंता करायचं काम नाही सरकार आपलच येणार आहे. आता पाच वर्षासाठी सरकार आल्यानंतर किनवट मतदारसंघातील एकही विकासकाम रखडवून ठेवणार नाही, असं आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com