VIDEO : आचारसंहितेबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : विधानसभेचे वारे राज्यात वाहत असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहिता लागण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

येत्या आठ दिवसांत आचारसंहिता लागेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग लवकरच फुंकल जाणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'विरोधक योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले आहेत. तुम्हाला नाही जमलं ते आम्ही केल. योजना आम्ही आणली तर तुमच्या पोटात का दुखत?' असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात येत्या आठ दिवसांत विधानसभेसाठी आचारसंहिता लागू शकते. अशातच विरोधी पक्षातले लोक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले आहे. आम्ही योजना आणली, तुमचं सरकार असताना तुम्हाला ही योजना आणता आली नाही. तेच आम्ही केलं तर आता तुमच्या पोटात का दुखत? आम्ही कधीच विकासकामावर परिणाम होऊ दिलेला नाही. मग योजनेला विरोध कशासाठी?' असा सवाल अजित पवार यांनी बोलताना उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com