Nashik Dengue News Video: नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णात वाढ; महापालिकेकडून दंडात दुप्पट वाढ
नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी नाशिक महानगरपालिका अॅक्शन मोडवर आलीय. शहरातील डेंग्यू डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांना नष्ट केलं जात आहे. परंतु महापालिकेच्या मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं पालिकेने दंडाच्या रक्कमात वाढ केलीय. डेंग्यूच्या प्रती स्पॉट २०० रुपयांऐवजी ५०० रुपये तर बिल्डर्ससाठी १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. जर बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती ठिकाणं दिसली तर बिल्डर्सवर मोठी कारवाई केली जाणार आहे. तर निवासी स्थानाजवळ डबके आढळले तर नागरिकांकडून पालिका ५०० रुपयांचा दंड वसूल करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने हा निर्णय घेतलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.