उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ६ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे सेनेच्या बंडखोर खासदारांच्या प्रकरणावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच अंतिम निर्णय देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी नुकतीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. तत्पूर्वी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होण्याबाबत ओम बिर्ला यांना पत्र दिले होते. लोकसभा सचिवालयात यावर कायदेशीर तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता ओम बिर्ला हे अंतिम निर्णय काय देतात याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. आम्ही लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. संवैधानिक तरतुदींचा दाखला देतानाच आमची बाजू त्यांच्यासमोर मांडली. जोपर्यंत मूळ पक्ष अन्य कोणत्या राजकीय पक्षात विलीन होत नाही आणि त्या विधीमंडळ पक्षाच्या दोन तृतीयांश सदस्यांची सहमती होत नाही, तोपर्यंत विलीनीकरण मान्य केला जाऊ शकत नाही ही बाजू आम्ही जोरकसपणे मांडली, असे देसाई यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.