DCM Eknath Shinde : विरोधकांनी आता रडगाणं बंद करावं, एकनाथ शिंदेंचा टोला|Marathi News

Eknath Shinde Criticized Mahavikas Aghadi On EVM Scam : तुम्ही विजयी झाले तर EVM चांगलं. पण जिथे पराभव झाला की EVM वाईट, जिंकल्यावर बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी का करत नाही? असा सवाल आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले.

लोकसभेत दोन लाखांचा फरक असून त्यांना जागा जास्त असून त्यांचे उमेदवार जास्त आले. विरोधीपक्षाकडे कोणताही मुद्दा राहिला नाही. तुम्हाला जागा जास्त मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो. पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो. त्यांनी आता रडगाणं बंद करावं, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांवर केली आहे.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली झाली. विरोधात निकाल गेला तर कोर्टावरही त्यांनी आरोप केले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंड, कर्नाटकात मतदान झाले. लोकसभेत झाले. प्रियांका गांधीही पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. जेव्हा आपला पराभव होतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचे. जेव्हा जिंकतो तेव्हा बॅलेट पेपरची कोणी मागणी का करत नाही असा सवाल करत हा दुटप्पीपणा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com