बोईसरमध्ये दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न; ज्वेलर्सवर गोळीबार, पाहा व्हिडिओ

Boisar Chaturbhuj Jewellers Gunfire CCTV Footage: बोईसरच्या गणेश नगर भागात दिवसाढवळ्या दरोड्याच्या प्रयत्नाने खळबळ उडाली आहे. चतुर्भुज ज्वेलर्सवर गोळीबार करून आरोपी पसार झाले.

बोईसरच्या गणेश नगर भागात दिवसाढवळ्या दरोड्याच्या प्रयत्नाने खळबळ उडाली आहे. गणेश नगर येथील चतुर्भुज ज्वेलर्स या सराफा दुकानावर काही अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपींनी दोन राऊंड गोळीबार केला. मात्र सुदैवाने दुकानमालकाला गोळी लागली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गोळीबारानंतर आरोपी रिव्हॉल्वर घटनास्थळीच टाकून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेली रिव्हॉल्वर जप्त केली असून, घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी बोईसर पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com