Wankhede Satadium बाहेर क्रिकेट प्रेमींची गर्दी; चाहत्यांच्या लांबच लांब रांगा!

Team India News: टीम इंडियाला भेटण्यासाठी चाहत्यांनी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर तुफान गर्दी केलीये.

भारतीय क्रिकेट संघ थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार असून,त्यांच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज झाले आहे.दरम्यान चाहत्यांनी मोठ्या संख्येने वानखेडे स्टेडियमच्या बाहेर गर्दी केलीये. मरीन लाइन पासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केलाय.सर्वत्र चाहत्यांची गर्दी झालीये. मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा चाहत्यांकडून केल्या जातायत. सर्वत्र एकच जल्लोष आणि आनंदाच वातावरण निर्माण झालं आहे. जगज्जेत्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com