Dharashiv News : पावसाने उडवली दाणादाण; VIDEO

Rain in Maharashtra : राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काढणीला आलेल्या पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे.

मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता काढणीला आलेल्या पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. पीकं पाण्याखाली गेलेली आहेत. तर काही ठिकाणी पिकांवर रोग पडला आहे.

धारशिव जिल्ह्यात देखील अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालेलं बघायला मिळत आहे. शेतात पाणी सचल्याने सोयाबीन पीक अक्षरश: चिखलात आडवे झाले आहेत. जवळपास 2 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा 1200 कोटींचा फटका बसणार आहे. दरम्यान, असाच पाऊस सुरू राहील तर या नुकसणीत वाढ होण्याची भिती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धारशिवच्या 16 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ठेवला होता. त्यानंतर पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने सर्व पीक वाया गेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com