VIDEO: Samruddhi Highway ला भेगा, रस्त्याच्या कामावरून विरोधकांचे सरकारवर ताशेरे

Samruddhi Highway News: छत्रपती संभाजीनगर जवळ समृद्धी महामार्गाला भेगा, शहापूरनजीकही गावामध्ये येणाऱ्या ब्रीजला खड्डा, विरोधीपक्षाचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर जवळ समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या आहेत, पन्नास फुट लांबीआणि तीन इंच रुंदीच्या भेगा पडल्या असून शहापूरनजीकही गावामध्ये येणाऱ्या ब्रीजला खड्डा पडला आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित केला जात असून अपघाताची भिती देखील व्यक्त केली जात आहे. यावर विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. समृद्धी मार्गावर रोज लोकांचे जीव जात आहेत, समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला परंतु या सरकारला त्याची काळजी नाही असं म्हणत हे सरकार निर्लज्ज सरकार आहे. अशी गंभीर टीका कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. ५५ हजार कोटीच्या समृद्धी मार्गाच्या प्रोजेक्टमध्ये २० हजार कोटी रुपये शासनाचे अतिरिक्त काढले गेले, ज्याच्यातुन काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाभ झाला असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com