प्रकाश आंबेडकरांबद्दल वादग्रस्त पोस्ट, कार्यकर्त्यांनी तरुणाला चोपले
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली. यामुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला त्यांनी चांगलाच चोप दिला. यामुळे अकोल्याच्या तेल्हारा शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
यवतमाळमध्ये कचरा डेपो हटवण्यासाठी रास्ता रोको
यवतमाळच्या सावरगड ग्रामस्थांनी कचरा डेपो हटवण्यासाठी रास्ता रोको केला. शहरातील संपूर्ण कचरा सावरगडस्थित प्रकल्पात आणून टाकला जातो. त्याला विरोध म्हणून कचरा संकलन केलेल्या घंटागाड्या त्यांनी परत शहरात पाठवल्या. कचऱ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याने कचरा डेपोला विरोध दर्शवला आहे.
यवतमाळमध्ये १८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल
यवतमाळ जिल्ह्यातील 175 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक तर पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. 26 मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे 180 ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल लवकरात वाजण्याची शक्यता आहे.
वाशिममधील मेडशीत भीतीचं सावट
वाशिममध्ये मेडशीजवळ असलेल्या पुलाखाली बिबट्याचे 2 बछडे आढळले. दरम्यान बिबट्याची पिल्लं आढळल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली. परिसरात बिबट्याची पिल्लं आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
भंडाऱ्यातील गुळ उत्पादक शेतकरी संकटात
भंडारा जिल्ह्यात तुमसर - मोहाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा गुळाला कमी भाव मिळत असल्याने भंडाऱ्यातील गुळ उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत.. गेल्या वेळी 4500 हजार इतका दर एका गुळाच्या बोरीला मिळत होता. मात्र आता 3500 रुपये इतका दर मिळत असल्याने उत्पादक संकटात सापडलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.