Political Update : राऊत - राणे भिडले ! पवारांच्या डोक्यातील कळायला १०० जन्म लागतील

Nitesh Rane - Sanjay Raut : संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवर नितेश राणे यांनी फडणवीस तुमचा सगळ्यांचा बाप आहे, असे म्हणत पालटवर केला आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. '' शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे फडणविसांना १०० जन्म कळणार नाही.'' असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. तर यावर प्रत्युत्तर देत, ''देवेंद्र फडणवीस हा तुमचा सर्वांचा बाप आहे,'' असा पालटवार नितेश राणे यांनी राऊत यांना लगावला आहे. त्यामुळे राऊत आणि राणे ही पुन्हा एकदा भिडलेले असल्याचे बघायला मिळत आहे.

फडणवीस यांना पवारांच्या डोक्यात काय सुरू आहे हे कळलं असत तर त्यांची आज झालेली अवस्था झाली नसती. २०१९ मध्ये सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होत ही फडणवीसांना कळलं नव्हत, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे ही कळायला देवेंद्र फडणवीस यांना १०० जन्म लागतील.'' अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर नितेश राणे यांनी पालटवर करत, '' देवेंद्र फडणवीस ही काय रसायन आहे हे उद्धव ठाकरे यांना आत्तापर्यंत समजल असेल. फडणवीस यांच्या मेंदूचा परिणाम असा झाला आहे की, तुझ्या मालकाला काँग्रेस समोर जाऊन मुजरा करावा लागत आहे. तुम्हाला छोटासा गट स्थापन करून निवडणूक लढवावी लागत आहे, देवेंद्र फडणवीस हा तुमचा सर्वांचा बाप आहे. अशा शब्दात टोला लगावला आहे. त्यामुळे राऊत - राणे यांच्यात शाब्दिक वाद चांगलाच तापलेला दिसला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com