VIDEO : तुतारीसाठी अनेक उमेदवार इच्छुक; मोठी अपडेट आली समोर

Assembly Election : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मेगा भरती सुरू आहे. रविवारी पुण्यात इच्छुक उमेदवारांची मुलाखत स्वत: शरद पवार यांनी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षात मेगा भरती सुरू आहे. त्यातच आता तुतारी चिन्हवर लढण्यासाठी 1600 इच्छुक उमेदवारांचे अर्ज शरद पवार यांच्याकडे आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विदर्भातून लढण्यासाठी मोठ्याप्रमाणात इच्छुक उमेदवार दिसून येत आहेत. तर एकट्या नाशिक मधून 68 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मेगा भरती सुरू आहे. शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यासंदर्भात रविवारी पुण्यात एक बैठक पार पडली. सर्व इच्छुक उमेदवार यावेली पुण्यात उपस्थित होते. या बैठकीत 1600 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. यात एकट्या नाशिकमधून 68 अर्ज शरद पवार यांच्याकडे आले आहेत. तर विदर्भातील आकडा देखील मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. काल मराठवाड़ा मुलाखती पार पडल्या, तर आज विदर्भ आणि उद्या उत्तर महाराष्ट्रमध्ये मुलाखत होणार आहे. त्यानंतर 8 आणि 9 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र, 10 ऑक्टोबरला मुंबई आणि कोकण मुलाखती पार पडणार आहेत. या सर्व इच्छुकांच्या मुलाखती स्वत: शरद पवार यांनी घेतलेल्या आहेत. यामधून आता कोणाची निवड होणार, कोणाला उमेदवारी मिळणार ही बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com