Video : 'मी आमदार आहे की चपराशी?', आमदार यशोमती ठाकूर कडाडल्या....

Yashomati Thakur News : अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समिती बैठकीत कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. या दरम्यान त्यांनी काही गंभीर आरोप केले. नेमकं काय म्हणाल्या?

अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान जिल्हा नियोजन समिती बैठकीत गोंधळ झाला. कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 'तुमच्या सरकारमध्ये माझा वारंवार अपमान होत आहे', अशी खंत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या बैठकीत हा गोंधळाचा प्रकार घडला. 'बोलतात एक व करतात एक असं काम सुरू' असा आरोप यावेळी यशोमती ठाकूर यांनी केला आहे. तसेच जाणीवपूर्वक निधी देत नसल्याचाही आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. निधी वाटपावरून यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे. 'मी आमदार आहे की चपराशी?', असं म्हणत आमदार यशोमती ठाकूर कडाडल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com