VIDEO: 'माणुसकीला काळीमा फासणारी घटना'; ससूनमधील घटनेवरुन रविंद्र धंगेकर संतापले

Sassoon Hospital Latest News: या घटनेवरुन काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत ससून रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला उपचाराऐवजी डॉक्टरनेच निर्जनस्थळी सोडून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या घटनेवरुन काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत ससून रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा कारभार ससूनमध्ये होत असेल तर दुर्दैवी आहे. प्रचंड पैसा ससूनवर खर्च केला जातो. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. ससूनची चौकशी करा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तरच लगाम बसेल, असे म्हणत रविंद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com