VIDEO : लग्न करा, मुलं जन्माला घाला, नाहीतर जॉब विसरा, कंपनीचं अजब फर्मान

Marriage Mandatory for Job: लग्न करा, नाहीतर जॉब विसरा असे अजब फार्मान चीनमधील एका कंपनीने काढले आहे, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Marriage Mandate, Job Loss : लग्न करा, मुलं जन्माला घाला, नाहीतर जॉब विसरा असे अजब फर्मान चीनमधील एका कंपनीने काढले आहे, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कारण लग्न केले नाही तर कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार आहे. चीनमधील शेडोंग प्रांतात असणाऱ्या शंटियन केमिकल ग्रुपने हे अजब फर्मान काढले होते. या कंपनीमध्ये १२०० कर्मचारी काम करत होते. टीकेची झोड उडाल्यानंतर कंपनीने आपला निर्णय मागे घेतला आहे.

कंपनीने काय फर्मान काढले?

लग्न न झालेले अथवा घटस्फोटित कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लग्न करावे, अन्यथा नोकरी सोडा.. सप्टेंबरपर्यंत लग्न करा नाहीतर नोकरी गमावावी लागेल, असे फार्मान चीनमधील या कंपनीने काढले होते. त्यानंतर सोशल मीडियावर कल्ला उडाला. सोशल मीडियावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या, त्यानंतर हा अजब निर्णय मागे घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com