Mumbai CNG price hike : मुंबई महानगर प्रदेशात (MMR) १ जून २०२५ पासून सीएनजीच्या दरात ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रति किलो सीएनजीचा दर ₹८० झाला आहे. हा बदल महापालिका क्षेत्रातील सर्व सीएनजी स्टेशन्सवर लागू होईल. तसेच, पाइपलाइनद्वारे पुरवले जाणारे स्वयंपाकाचे गॅस (PNG)चे दर ₹४९ प्रति युनिट कायम आहेत. दरम्यान, नोव्हेंबर, डिसेंबर आणि एप्रिलनंतर ही चौथी वाढ आहे.
या वाढीनंतर मुंबई, ठाणे आणि एमएमआरच्या इतर भागांत सीएनजीची नवीन किंमत ८० रुपये प्रति किलो असेल. मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि बसेससह सार्वजनिक वाहतुकीची अनेक वाहने सीएनजीवर अवलंबून आहेत.
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) च्या अधिकाऱ्याने सांगितले की, देशांतर्गत नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्यात कपात आणि वाढत्या मागणीमुळे बाजारभावाने गॅस खरेदी करावा लागत आहे, ज्यामुळे खर्च वाढला आहे. त्यामुळे सीएनजीच्या किंमतीत ही वाढ करावी लागली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.