VIDEO : अखेर आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट; तोडगा निघणार ?

Aadivasi Andolan News : आदिवासी आमदारांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट हॉलमध्ये आमदारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीसाठी वेळ देत नसल्याने आदिवासी आमदारांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या होत्या. आमदार नरहरी झिरवळ, हिरामण खोसकर यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर आता आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर वेळ दिला आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नरहरी झिरवळ गत काही दिवसांपासून आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. याशिवाय आदिवासींची पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री शब्द देत असले तरी चर्चेसाठी वेळ देत नसल्याने आदिवासी आमदारांनी संताप व्यक्त करत शुक्रवारी टोकाचं पाऊल उचललेलं दिसल. त्यामुळे मंत्रालयात गोंधळ उडाला होता. आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मुख्यमंत्री वेळ देऊ शकले नसल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिलेली आहे. त्यात आता काय चर्चा होईल हे बघण महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com