CM Devendra Fadnavis : सावित्रीबाईंच्या मूळगावी उभारणार स्मारक, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा | Video

Devendra Fadnavis Announcement : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मोठी घोषणा केली आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी त्यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. याबद्दलची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. साताऱ्यातील नायगाव येथे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. कार्यक्रमच्यावेळी भाषणात बोलताना फडणवीस यांनी हे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, या गावच्या सरपंचांनी मांडलेल्या मागण्या पुर्ण होतील. सहा वर्षांनी सावित्रीबाई फुलेंची द्वीशताब्दी सुरु होईल. त्या आधी इथले स्मारक पुर्ण व्हायला हवे. सहा वर्षांनी सावित्रीबाई फुलेंची द्वीशताब्दी सुरु होईल. त्या आधी इथले स्मारक पुर्ण व्हायला हवे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १० एकर जमीनीचे अधिग्रहण करावे, आम्ही निधी कमी पडू देणार नाही. पाच वर्षांनी हे स्मारक पुर्ण होईल. देशात आणि राज्यात 33 टक्के महिला आरक्षण लागू झाल्याने महिलांना संधी मिळेल. हे राज्य फुलेंनी दाखवलेल्या समानतेच्या मार्गाने काम करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com