Nanded Flood: नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत, रस्ते जलमय|VIDEO

Nanded News: नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केला असून रस्ते वसाहती जलमय झाल्या आहेत. घरात व दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
Summary

नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत

श्रावस्ती नगर, आनंद नगर, दत्तनगर, वसनगर परिसर जलमय

घरात व दुकानात पाणी शिरल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान

प्रशासनाकडे तातडीने पाण्याचा निचरा करण्याची मागणी

नांदेड : शहरात रात्री उशिरा आणि पहाटे ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही तासांच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचून गेला असून नागरिकांचे हाल झाले आहेत. श्रावस्ती नगर, आनंद नगर, दत्तनगर, वसनगर यासह अनेक भाग जलमय झाले आहेत. पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहरातील सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com