MVA News : अणुशक्तीनगरच्या जागेवरून मविआत तिढा

Maharashtra Politics : अणुशक्तीनगर मतदारसंघावरून मविआत तिढा असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. या जागेसाठी नेमकं कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मविआत १५० जागांबाबत सहमती झाली असल्याची माहिती आहे. मात्र भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर मतदारसंघावरून तिढा असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. समाजवादी पक्षाने भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगरच्या जागा मागीतल्या असल्याने महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र सपाने मागितलेल्या दोन्ही मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नकार दिलाय. अणुशक्तीनगर विधानसभेचा जो कोणी उमेदवार असेल तो तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावरच लढेल, असा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पवित्रा घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे आता सपा काय निर्णय घेणार पाहाणं गरजेचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com