Eknath Khadse : खडसेंचा पक्षप्रवेश रखडला कुठे? भाजप नेत्यांनी दिल स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule Gave Explaination : एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला राज्यातील कोणत्याही नेत्याचा विरोध नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा विरोध नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

माझ्या भाजप प्रवेशाला महाराष्ट्रातील २ बड्या नेत्यांचा विरोध आहे असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना बावनकुळे यांनी राज्यातील नेत्यांचा खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे सांगितले आहे. मात्र विरोध करणारे ते २ नेते कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली बघायला मिळत आहे. 'माझा भाजपात पक्ष प्रवेश झाला आहे. पण घोषणा झालेली नाही. या पक्षप्रवेशाला राज्यातील २ नेते विरोध करत आहेत,' असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला महाराष्ट्रातील भाजपच्या कोणत्याही नेत्याचा विरोध नाही. त्यांचा पक्षप्रवेश हा एकंदरीत सगळ्या मुद्द्यावर चर्चा करून होणार आहे, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com