VIDEO : उद्धव ठाकरे अन् बावनकुळेंत जुंपली !

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी नागपुरात फडणवीस यांच्यावर केलेल्या टिके नंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ठाकरे यांच्यावर पलटवार केला असल्याने ठाकरे आणि बावनकुळे यांच्यात जुंपलेली बघायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. 'देवेंद्र फडणवीस यांचं डीपॉझिट जप्त झालंच पाहिजे. आपला निसटता विजय नको, दणदणीत विजय झालाच पाहिजे.' अशी टीका रविवारी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आता बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.

रविवारी नागपूर इथे सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी,'' हे सरकार उलथून टाकायचं आहे. नागपूरमधून फडणवीस यांचं डीपॉझिट जप्त झालंच पाहिजे. आपला विजय निसटता नाही, दणदणीत झाला पाहिजे.'' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता केली होती. त्यावर सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. '' देवेंद्र फडणवीस यांचं डीपॉझिट जप्त करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी एका विधानसभा निवडणुकीत जिंकून दाखवावं.'' असं म्हणत थेट आव्हान त्यांनी ठाकरे यांना केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com