Chandrakant Patil VIDEO: पुणे ड्रग्स प्रकरणावरुन चंद्रकांत पाटलांच 'हे' आवाहन

Chandrakant Patil on Pune Drugs News: ड्रग्ज प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. यादरम्यान त्यांनी मोठं आवाहन केलं आहे.

पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ड्रग्जचे प्रमाण वाढले, चिंता वाढली नक्की आहे पण 70 लाख जनतेच शहर कामातून गेलं अश्या प्रकारची प्रतिमा तयार होत आहे. यातुन पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. सगळ्यात चांगले शिक्षण संस्था ह्या पुण्यात आहे, पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे. अशा शहराची व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेलं शहर अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे. असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. घटना घडल्यावर किंवा तात्पुरती कारवाई न करता प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com