Chandrakant Patil आणि Sanjay Raut यांच्यात भेट; भेटीवर राऊतांचं मोठं वक्तव्य!

Chandrakant Patil - Sanjay Raut Meet: विधान भवनाच्या पायऱ्यांवर चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांची भेट झाली, भेटीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.दरम्यान या भेटीसंदर्भात राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

विधान भवनामधील 2 भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.अजित पवार आणि जयंत पाटील यांनी देखील विधानभवनात भेट घेतली. त्याचबरोबर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची देखील विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल खुलास अशी भेट झाली. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.दरम्यान राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर संजय राऊतांनी (Sanjay Raut ) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, आमचं आणि चंद्रकांत पाटलांंचं वैचारिक भांडण आहे, वयक्तिक नाही. आणि ते तसचं राहिलं असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com