Maharashtra Exit Poll : महायुतीला 152 ते 160 जागांवर मिळणार आघाडी? चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलची आकडेवारी

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच मतदान आज पार पडलं आहे. त्यानंतर आता कोणाची सत्ता राज्यात येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. निकालापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर यायला सुरुवात झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने चाणक्य स्ट्रॅटेजीचा एक्झिट पोल देखील आता समोर आला आहे. यात महायुतीत भाजपला 90 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 48 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 22 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील असा अंदाज चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉँग्रेस 63 पेक्षा जास्त जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाला 40 प्लस जागा मिळणण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला कमी जागा मिळत असल्याचं या एक्झिट पोलमधून दिसत आहे. तर महायुती 152 ते 160 जागांवर विधानसभेत बाजी मारणार असल्याचं चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलने अंदाज लावला आहे. त्याच ठिकाणी महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर आघाडी मिळण्याची शक्यता आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com