VIDEO : 'लाडकी बहीण'वरून गडकारींचा सरकारला घरचा आहेर; केलं मोठं विधान !
लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत असल्यामुळे गुंतवणूकदारांना अनुदानाचे हे पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरवशावर राहू नये, असा घरचा आहेरच गडकरी यांनी सरकारला दिला आहे. नागपूरमध्ये अमेझिंग विदर्भ या कार्यक्रमात ते उद्योजकांशी संवाद साधत होते.
लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर सतत टीका होत आहे. विरोधकांकडून या योजनेबद्दल नाराजी दर्शवली जात आहे. असं असतानाच आता सत्ताधारी पक्षातील मंत्रीच या योजनेबद्दल विधान करून सरकारला घरचा आहेर देत असल्याने चर्चा रंगली आहे. ''लाडकी बहीण योजनेचं अनुदान अनेकांना मिळेल की नाही याची शाश्वती नाही. या योजनेवर पैसा द्यावा लागत आहेत. सरकार विषकन्या असते, ज्याच्यासोबत जाईल त्याला बुडवेल. उद्योजकांनी या योजनेच्या भरवशावर राहू नये.'' अशा प्रकारचं विधान गडकरी यांनी केलं आहे.
दरम्यान, मंत्री गडकरी यांच्या विधानावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''त्यांचा पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. त्यांना आमच्यापेक्षा जास्त आतल्या गोष्टी माहिती असतील. राज्याची आर्थिक स्थिती जर धोक्यात आहे, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे.'' असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.