Nitin Gadkari : घराणेशाहीवर गडकारींचं मोठं विधान
'घरणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करूच नका, ते एका मिनिटात सरळ होतील,' असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. राजकरण्यांकडून आपल्या कुटुंबातील व्यक्तीना तिकीट देण्याचा आग्रह होत असतो. त्यावर गडकरी यांनी ही मोठं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.
'माझ्या मुलाला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या, हे चालतं कारण लोक त्यांना मत देतात. ज्या दिवशी लोक ठरवतील की वारसाहक्काने आलेल्यांना आम्ही मतदान देणार नाही, त्यादिवशी हे लोक एका मिनिटात सरल झाल्याशिवाय राहणार नाहीत.'' असं विधान राजकारणातील घराणेशाहीवर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. दरम्यान, आता गडकरी यांच्या या विधानाने चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.