VIDEO: पुण्यातील पार्टी झालेल्या हॉटेलचं CCTV फुटेज तपासणार, साम टिव्हीला पोलिसांची माहिती

Pune Police On Pune Drugs VIDEO: नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री संदर्भात पुणे पोलीसांकडून चौकशी केली जात आहे. पोलीसांकडून हॉटेलमधील CCTV फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे: ललीत पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर पुण्यात ड्रग्ज संदर्भात अजून एक बातमी समोर आली आहे. नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमधील हा व्हिडीओ होता. पुण्यातील FC रोडवरील Liquid Leisure Lounge मधील ही व्हिडीओ होती. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले आहेत. आता यासंदर्भात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पुणे पोलिसांच पथक पार्टी झालेल्या ठिकाणी दाखल झालं आहे. पोलीसांकडून हॉटेलमधील CCTV फुटेज तपासण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही पार्टी पहाटे सहा वाजल्यापर्यंत सुरु होती. तर गस्तीवर असलेल्या पोलीसांना ही पार्टी दिसली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com