केंद्रीय मंत्र्याच्या निकटवर्तीयाच्या बंगल्यावर बुलडोझर! नाशिकमध्ये ‘यूपी पॅटर्न’|VIDEO

Big Action in Nashik: नाशिकमध्ये उत्तर प्रदेश पॅटर्ननुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय व आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेच्या सातपूर येथीलअतिक्रमित इमारतीवर महापालिकेने बुलडोझर फिरवलं आहे.

नाशिकमध्ये उत्तरप्रदेश पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण उत्तर प्रदेश प्रमाणेच राजकीय गुंडांच्या अतिक्रमित बांधकामांवर महापालिकेनं बुलडोझर फिरवलाय. सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय आरपीआयचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेच्या नंदिनी नदी पात्रातील अनाधिकृत इमारतीवर पालिकेने हातोडा फिरवला असून त्याचं अतिक्रमित घर देखील पुढच्या पंधरा ते वीस दिवसात पाडण्यात येणार आहे.

मात्र, इतक्या मोठ्या अतिक्रमित इमारती उभ्या राहत असताना नाशिक महापालिकेने त्यावर तोडक कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सातपूर येथील एका हॉटेलमध्ये गोळीबार केल्या प्रकरणी प्रकाश लोंढे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र लोंढे याचा मुलगा भूषण लोंढे पोलिसांनी गुंगारा देत आहे. खंडणी, खून, जागा हडपणे, असे अनेक गुन्हे या लोंढे टोळीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com