Buldhana Police Bharati News: पोलीस भरतीसाठी तरुणांमध्ये उत्साह!

पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये उत्साह आहे. येत्या 2 जुलै पर्यंत पोलीस भरती प्रक्रिया सुरु राहणार आहे .

Buldhana Police Bharati: राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक जिल्ह्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी लागली किंवा पुढे ढकलण्यात आली. तर कुठे नियोजित कार्यक्रमही बदलावा लागलाय. मात्र बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या नियोजित वेळेनुसारच पोलीस भरती सुरू आहे आणि याचं कारणंही तसंच आहे. बुलढाण्यातही गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे. मात्र पोलीस अधीक्षकांच्या योग्य नियोजनामुळे पोलीस भरतीत कुठलाही खंड पडलेला नाही. पोलीस अधीक्षकांनी सुरुवातीपासूनच या भरतीचे योग्य नियोजन केलं होतं. त्यामुळे पाऊस आला तरी रात्री पोलीस भरतीचे संपूर्ण ग्राउंड हे ताडपत्रीने झाकले जात आहे. त्यामुळे पाऊस आला तरी ग्राउंड ओलं होत नाही किंवा चिखल होत नाही आणि त्याचमुळे पोलीस भरती प्रक्रिया बुलढाण्यात नियोजित वेळेनुसार सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com