armed robbery in Khamgaon Agarwal house : बुलढाण्यातील खामगाव शहरानजीक वाडी परिसरात एका घरावर 4 - 5 दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केलाय... चाकू आणि तलवारीने केलेल्या या हल्ल्यात पिता-पुत्र गंभीर जखमी झालेत... त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येतीये. दोघांनाही उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आलय... ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीसांकडून शोध सुरूये...
खामगाव शहरा नजीक असलेल्या वाडी परिसरात मयंक अग्रवाल व मनोज अग्रवाल यांच्या घरावर चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी रात्री घरात प्रवेश करत घरात असलेले पिता-पुत्र मनोज अग्रवाल व मयंक अग्रवाल यांच्यावर चाकू व तलवारीने हल्ला केला. यात दोन्ही पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चार दरोडेखोर हे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांचे वरिष्ठ अधिक अधिकारी स्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले आहे यामुळे खामगाव शहर व परिसरात मोठ्या दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.. पोलीस त्या दरोडेखोरांचा शोध युद्ध पातळीवर घेत आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.