ऐन दिवाळीच्या सणात बुलडाण्यात एक अनोखा पण संतापजनक प्रकार घडला. शहरात स्वच्छतेसाठी असलेल्या घंटागाडी शहारत फिरकत नसल्याने या निष्क्रियतेला कंटाळून माजी नगरसेवक आकाश दळवी यांनी स्वतःच पुढाकार घेत शहरभर सायकलवर घंटागाडी चालवत जागोजागी पडलेला कचरा गोळा केला आणि तो कचरा नगरपालिकेच्या गेटसमोर आणून टाकला. यावेळी त्यांनी नगर पालिका प्रशासनाचा निषेध केला. बुलडाणा शहर स्वच्छ करणेसाठी नगर पालिकेने कोट्यवधी रूपयांचा ठेका संबंधित ठेकेदार यांना दिलेला आहे.
मात्र गेल्या महिन्याभरपासून शहरात घंटागाडी येत नाही, स्वच्छतेसाठी कर्मचारीही येत नाहीत, यामुळे संपूर्ण शहरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे दळवी यांनी पुढाकार घेत सायकलवर घंटागाडीचा प्रतिकात्मक उपक्रम हाती घेत प्रत्येक चौक, गल्ली आणि घरांसमोर जाऊन कचरा स्वतः गोळा केला. हा जमा केलेला कचरा त्यांनी थेट नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून अधिकाऱ्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.