VIDEO: CBD Belapur मध्ये इमारत कोसळली, 3 जणांचा दुर्देवी मृत्यु, घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ Saam TV च्या हाती

CBD Belapur Building Collapsed News: Navi Mumbai मधील बेलापूरमध्ये भिषण इमारत दुर्घटना, पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास घडली घटना, घटनेचा व्हिडीओ Saam TV च्या हाती.

नवी मुंबईमधील बेलापूरमध्ये काल एक भिषण इमारत दुर्घटना घडली होती. ही दुर्घटना होतानाचा व्हिडीओ आता Saam TV च्या हाती आला आहे. सेक्टर 19 मध्ये असलेल्या शाहबाज गावामध्ये तीन माळ्यांची बिल्डींग कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा दुर्देवी मृत्यु झाला होता. या दुर्देवी घटनेचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे. पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत काही जण जखमी असल्याचीही माहिती समोर आली होती. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट निती आयोगाच्या बैठकीतून प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com