BMC Election 2025: बिहारनंतर भाजपचं मुंबई निवडणुकीसाठी 'MY' रणनीती, काय आहे नेमका प्लान?

Maharashtra Local Body Election: बिहार विधानसभ निवडणुकीमध्ये भाजपला MY समीकरणाचा चांगला फायदा झाला. आता बिहारनंतर मुंबई महानगर पालिकेसाठी भाजपचं 'MY' रणनीती ठरली आहे. महिला आणि तरुण यांच्यावर लक्ष केंद्रीय करणार आहेत.

बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळाले. आज बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बिहारमधील यशानंतर भाजपनं आता मुंबईतील आगामी निवडणुकांसाठी 'MY' समीकरणावर लक्ष केंद्रित केलं आहे. महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी ही नवी रणनीती आखण्यात येत आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमधील महिला आणि तरुण मतदारांची संख्या तसंच त्यांची मतं मिळवण्यासाठी भाजपकडून खास रणनीती आखली जाईल. यासाठी युवा मोर्चाकडे युवकांची मते मिळवण्याची तर महिला विंगकडे महिला मतदारांना सक्रिय करण्याची विशेष जबाबदारी सोपवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com